मुंबई – ‘तुम्ही वचन मोडलं. आणि मी मुख्यमंत्रिपद स्विकारलं आणि कारण माझ्या पित्याला मी वचन दिलं होतं. मी तुमच्या शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवले, असं वचन आणि जबाबदारी घेतली. कदाचित जर दिलेले वचन भाजपने पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. मात्र अजुनही मी शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री बनवणारच, अस विधान मुख्यमंत्री आणि शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केलं.
भाजपने दिलेले वचन पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. हे माझं क्षेत्र नाही, मी एक पूत्र कर्तव्य पार पडण्यासाठी ठामपणे उभा आहे’. तर मी शिवसैनिकाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणारच, अस आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिलं. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला आहे. यावेळी ते बोलत होते.
काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच. कारण संस्कार हे महत्त्वाचे असतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. काही दिवसांपूर्वीच फडणवीस म्हणाले होते की, मी अजुनही मुख्यमंत्री असल्यासारख आपल्याला वाटतं.