पुणे – अश्विन महिन्यातील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या नवरात्रीच्या काळात देवीची नऊ दिवस नऊ रूपात पूजा केल्यावर, अश्विन शुद्ध दशमीला आपण “दसरा’ हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा सण मुख्यतः “विजयोत्सव’ म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्व आहे.
आज शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे. तर दुसरीकडे नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्रपूजनही होत असते. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या दसरा मेळाव्यांकडे लागलेलं असते.
दसऱ्याला शमी व आपटा वृक्षाची पूजा करण्याची व आपटा वृक्षाची पाने “सोने’ म्हणून एकमेकांना देण्या-घेण्याची प्रथा आहे. याबद्दल काही कथा देखील आपल्याकडे आहेत.