नवी दिल्ली : दिल्लीतील जाफराबाद मेट्रो स्टेशन परिसरात सीएए विरोधी आंदोलनादरम्यान दोन गटांमध्ये दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या.
Delhi: Stone pelting between two groups in Maujpur area, tear gas shells fired by Police. https://t.co/Pqm7REZMGW pic.twitter.com/yJYHsUbuwk
— ANI (@ANI) February 23, 2020
जाफराबाद मेट्रो स्टेशन परिसरात महिलांनी सीएए विरोधी निदर्शने सुरु आहेत. निदर्शन करीत असताना दोन गटामध्ये वाद झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.“संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती सहआयुक्त अलोक कुमार यांनी दिली. तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याचे ते म्हणाले.