पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात सीरम इस्टिट्यूला भेट दिली. यावेळी सुरक्षा व्यवस्था, व्यवस्थापन, भेटणाऱ्या व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन व्यक्ती बाधित आढळल्याची माहिती समोर आली आहे.
हे अहवाल येताच या व्यक्तींना या दौऱ्याच्या कामकाजातून वगळण्यात आले. दौऱ्यापूर्वी सुमारे 250 जणांची करोना चाचणी करण्यात आली होती.
पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. मोदींना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी महापालिका आरोग्य विभागाने केली होती. यामध्ये पुणे विमानतळावर भेटणाऱ्या व्यक्ती आणि सीरममध्ये त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता.
त्यावर प्रशासनाने संपर्कात येणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी केली. यामध्ये दोघांना करोना बाधा झाल्याचे समोर आले होते.