नवी दिल्ली – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका टीव्ही रिपोर्टरला लाईव्हदरम्यान बंदुकीच्या धाकावर लुटले. ही घटना साऊथ आफ्रिकेतील असून १२ फेब्रुवारी रोजी घडली.
इक्वाडोर शहरात इसिड्रो रोमेरो कार्बो मॉनूमेन्टल स्टेडियमच्या बाहेर टीव्ही रिपोर्टर डिएगो ओर्डिनोला लाईव्ह प्रसारण करत होते. याचवेळी एका चोराने रिपोर्टरवर बंदूक रोखली आणि त्याला पैसे मागितले. यादरम्यान रिपोर्टर आपल्या सहकाऱ्यांना मोबाईल आणि पैसे देण्यास सांगतो. हे पैसे घेऊन चोर पळून जातो.
Ni siquiera podemos trabajar tranquilos, esto ocurrió a las 13:00 de hoy en las afueras del Estadio Monumental.
La @PoliciaEcuador se comprometió a dar con estos delincuentes. #Inseguridad pic.twitter.com/OE2KybP0Od— Diego Ordinola (@Diegordinola) February 12, 2021
यानंतर रिपोर्टर आणि सहकारी त्याचा पाठलाग करतात. परंतु, चोर पळून जाण्यास यशस्वी होतो. संपूर्ण घटनेदम्यान चोराने आपला चेहरा मास्कने झाकला होता. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.