‘त्या’ सराईताच्या चौकशीत तीन गावठी कट्टे हस्तगत

पुणे – मंगळवार पेठेत बॅंकेच्या बाहेर कमरेला गावठी कट्टा लावून उभ्या असलेल्या सराईत गुन्हेगाराकडून आणखी दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्याकडून एकून तीन गावठी कट्टे व तीन काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत. पोलीस कोठडीत केलेल्या चौकशीत हा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.

आकाश भगवान त्रीभुवन (वय-25,रा.बालेवाडी, पुणे) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुध्द साताऱ्यातील खंडाळा येथे एक खूनाच्या प्रयत्नाचा व इतर शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. त्याने इतके गावठी कट्टे कशासाठी आणले होते, याची चौकशी सुरु आहे.

समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना मिळालेल्या माहितीनूसार त्रीभुवनला 18 डिसेंबर रोजी जेरबंद करण्यात आले होते. प. त्याचे अंगझडतीत त्याच्या उजव्या बाजुच्या कमरेस पॅन्टच्या आत खोचलेला 30 हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा व काडतुस मिळून होते. त्याच्याविरुध्द आर्म ऍक्‍ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन पोलीस कोठडी घेण्यात आली होती. पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी दोन गावठी कट्टे व दोन काडतूसे हस्तगत केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलीस हवालदार संतोष काळे पोलीस शिपाई निलेश साबळे, हेमंत पेरणे, बाळासाहेब पाटोळे, दत्ता सोनवणे, सुभाष मोरे, शुभम देसाई, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, सचिन पवार, सुमित खुट्टे यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.