सांगली : सांगलीमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये मागील वर्षीची जुनी मूर्ती विसर्जनासाठी घेऊन गेलेल्या 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमके?
अक्षय बनसे (वय २०) आणि आदी रजपूत (वय १७) असे मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. एका गणेश मंडळाची गेल्या वर्षीची जुनी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी आली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे.सरकारी घाटावर मूर्ती पाण्यात सोडताना हा प्रकार घडला आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करत असताना तिघे जण वाहून गेले. हे पाहून तिथे उपस्थितीत असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि वाहून जाणाऱ्या एकाला वाचवले.
पण दोघे जण मात्र वाहून गेले आहेत. महापालिका आणि रेस्क्यू टीमकडून शोध मोहीम सुरू आहे. दोन्ही तरुण वाहून गेल्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोन्ही तरुणांचा शोध सुरु आहे. गणपतीच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक असताना ही घटना घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.