करोना काळात पक्षांचा आवाज झाला अधिक मधुर

अमेरिकेतील सायन्स मासिकातील निष्कर्ष

सॅन फ्रान्सिस्को –  गेल्या ८ महिन्यांच्या काळात करोनाच्या महामारीने साऱ्या जगाचे व्यवहार ठप्प केले असले तरी जीवसृष्टीतील प्राणी आणि पक्षी याना मात्र लाभ झाला आहे करोना काळात लॉक डाऊन अपरिहार्य असल्याने माणसांचे दैनंदिन व्यवहार थंडावले असले तरी याच काळात पक्षांचा आवाज आणि किलबिलाट मात्र अधिक मधुर झाला आहे.

सायन्स मासिकात याबाबतच्या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत नर पक्षी मादी पक्षाला आकर्षित करण्यासाठी जे कूजन करतो किंवा गाणे गातो ते गेल्या ८ महिन्यांच्या काळात अधिक मधुर आणि आकर्षक झाले असल्याचे या संशोधनात म्हटले आहे

लॉक डाऊन काळातील मानवी वर्तणुकीचा पक्षांवर कसा प्रभाव पडतो याचा शोध करण्यासाठी हा
अभ्यास करण्यात आला होता या काळात पक्षी अधिक हळुवारपणे गायला शिकलेच शिवाय त्यांच्या
आवाजाची रेंजसुद्धा वाढल्याचे समोर आले नर पक्षांचा आवाज आता जास्त अंतरापर्यंत ऐकू येऊ
लागला आहे

या संशोधनात एक भीती मात्र व्यक्त करण्यात अली आहे ती म्हणजे लॉकडाऊनमुळे उंदीर आणि घुशी
अधिक आक्रमक होऊ शकतात

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.