रायपुर – करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट देशासाठी प्रचंड घातक ठरली. विषाणू संसर्गाचा महासंकटाचा फायदा घेण्यासाठी समाजातील अपप्रवृत्ती सरसावल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या. यामुळे समाजात माणुसकी उरली आहे काय? असा प्रश्न सर्वांपुढे उभा राहिला.
Chhattisgarh: Constable Rajesh Patel feeds around 500 monkeys every day near Kudargarh Dham in Surajpur district
“They used to get food when devotees visited temple. I started feeding them during the lockdown. Forest dept should start an initiative to feed monkeys,” he says pic.twitter.com/u7JBDJquH3
— ANI (@ANI) June 9, 2021
मात्र अशा नकारात्मक वातावरणात देखील समाजातील काही लोकांच्या कृती माणुसकी आजही शिल्लक आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेशा ठरत आहेत. असेच एक उदाहरण छत्तीसगड येथील सुरजपूर जिल्ह्यात घडले आहे. येथील पोलीस हवलदार राजेश पटेल यांनी करोना काळात दाखवलेली भूतदया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस हवलदार राजेश पटेल हे कुदरगड धाम या तिर्थक्षेत्र परिसरातील सुमारे 500 माकडांना दररोज खायला घालत आहेत.
याबाबत बोलताना पटेल यांनी, “लॉक डाऊनमुळे येथे भाविक येणे बंद झाले आहे. त्यामुळे येथील माकडांची उपासमार होते. त्यामुळे मी दररोज जवळपास पाचशे माकडांना खायला घालतो. वनविभागाने याबाबतची दखल घेऊन माकडांची उपासमार थांबवायला हवी.” अशी मागणी केली.
दरम्यान, करोना काळात आपल्या सख्ख्या नातेवाईकांनाही मदतीसाठी पुढे न येण्याच्या अनेक घटना घडत असतानाच पोलीस शिपाई पटेल यांची कृती वाखानण्याजोगी आहे.