एअर स्ट्राईकवेळी पंतप्रधान होते ऍक्‍शन रुममध्ये

जम्मू काश्‍मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 12 दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई करत तब्बल 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हवाई दलाच्या या कारवाईच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ऍक्‍शन रुममध्ये हजर होते. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर बॉम्ब हल्ले केले. या हल्ल्‌यात जैश ए मोहम्मदची अल्फा 3 कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त केली गेली. या हल्ल्‌यात जवळपास 350 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.