दौंड – दौंड येथील जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये राज्य राखीव पोलीस बलाचे जवान आणि सिनेकलावंत सापडल्याने शहरात याबाबत चर्चेला उधाण आले आहे. जुगार अड्ड्यावरील छाप्यात 2 लाख 12 हजार 731 रुपयांच्या मुद्देमालासह 14 जणांना ताब्यात घेण्यात येवून त्यांना पर्सनल बॉण्डवर सोडण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
दौंड शहरातील इंदिरानगरमध्ये एका बंद खोलीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी (दि.19) अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह छापा टाकला. सर्व आरोपी रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेण्यात आले. यात मोसिन इक्बाल शेख, अनिकेत शंकर बंडलकर, कमलाकर सबाजी गायकवाड, राजेंद्र जगन्नाथ सोनवणे, बबन बाबुराव गावडे, शैलेश दिगंबर पितांबरे, दिपक निवृत्ती सोनवणे (सर्व, रा. ता. दौंड), सारंग प्रकाश जाधव, पंडित दौलत खोरे (दोघे रा. शिरूर), सुभाष जयसिंग पाचपुते, (रा.काष्टी, ता. श्रीगोंदा), मनोज मल्हारी म्हस्के (रा. सिद्धटेक, ता. कर्जत) यांना ताब्यात घेण्यात आले होते तर इक्बाल बाबुलाल शेख, पंडित मल्हारी पेटकर, देविदास बाळासाहेब मुटकुले, शशिकांत परमेश्वर खराडे, शिवाजी आनंदराव बागल (सर्व रा. दौंड) हे तेथुन फरार झाले होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
छाप्यातील पथकामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस हवालदार संदीप जाधव, सुरेंद्र वाघ, पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे, पोलीस हवालदार दशरथ कोळेकर, विशाल जावळे, सचिन बोराडे, महिला शिपाई रूपाली पवार यांचा सहभाग होता.