हळुवार प्रेमाचे उत्स्फूर्त आणि आनंददायी क्षण साजरे करण्याच्या उद्देशाने एंगेजतर्फे पॉकेटफूल ओस्टोरीज 2.0 या यशस्वी पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच झाली. भारतातले आघाडीचे प्रेमकथा लेखक दुर्जोय दत्ता यांनी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. गेल्या वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या आणि फिक्शन विभागात बेस्टसेलर ठरलेल्या एंगेज पॉकेटफुल ओस्टोरीजच्या अभूतपूर्व यशानंतर ओस्टोरीज 2.0 प्रकाशित करून प्रेमाचा हा सिलसिला कायम ठेवला आहे. उत्स्फूर्त आणि हळुवार प्रेमाच्या क्षणांच्या अनेकांकडून मागविलेल्या “अलक’ म्हणजेच अतिलघुकथांचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे.
यात प्रत्येक प्रेमकथेचा शेवट हा वेगळं वळण असणारा हवा अशी या उपक्रमाची संकल्पना होती. आपल्या तरुण चाहत्यांना त्यांच्या मनातली, स्वरचित अशी प्रेमाची उत्स्फूर्त, हळुवार आणि आनंददायी प्रेमकथा गुंफता यावी यादृष्टीने या संपूर्ण मोहिमेची आखणी करण्यात आली होती. या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळून अपेक्षेपेक्षा जास्त कथा प्राप्त झाल्या.
दुर्जोय दत्ता यांच्या साथीने आयटीसी एंगेजने त्यातल्या सर्वोत्तम कथा निवडल्या. त्यात स्वतः दुर्जोय दत्ता यांनी लिहिलेल्या काही खूपच रोचक, उत्स्फूर्त प्रेमकथांचाही समावेश आहे. ओस्टोरीज 2.0 असे या पुस्तकाचे नाव असून उत्स्फूर्त आणि हळुवार प्रेमाच्या क्षणांच्या अनेकांकडून मागविलेल्या अलक म्हणजेच अतिलघुकथांचं संकलन असलेलं हे पुस्तक आहे.