“ब्रॅण्डेड’च्या नावाखाली “डुप्लिकेट’ दारू

अपहार करणाऱ्या दोघांना अटक; कारवाई सुरू राहणार

लोणावळा – येथील प्रसिद्ध “डेला ऍडव्हेंचर ऍण्ड रिसॉर्ट’ कंपनीच्या बारमध्ये ग्राहकांना सर्व्हे करण्यात येणाऱ्या अधिक किंमतीच्या “ब्रॉण्डेड’ दारूच्या बाटलीमध्ये कमी प्रतीची स्वस्त दारू भरून त्याद्वारे अपहार करणाऱ्या तसेच एका कंपनीच्या पेयाचे डबे चोरी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “डेला ऍडव्हेंचर अँड रिसॉर्ट’ कंपनीचे हॉटेल व्यवस्थापक कुणाल कमलेश नायर यांनी फिर्याद नोंदविली आहे. सुरेन हेमकुमार प्रधान (वय 30, मूळ रा. सिक्‍कीम) आणि मनोजकुमार महेंद्रसिंग (वय 25, मूळ रा. हरियाणा, सध्या दोघे रा. नांगरगाव, लोणावळा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हे “डेला ऍडव्हेंचर ऍण्ड रिसॉर्ट’ बारमध्ये अनुक्रमे बार व्यवस्थापक आणि बार कॅप्टन म्हणून काम करीत होते. दोघेही बार काउंटरच्या खाली बसून ग्राहकांना सर्व्हे करण्यात आला. उच्च प्रतीच्या दारूच्या बाटलीत कमी प्रतीची दारू भरून अपहार करीत असे. तसेच आरोपींनी पाच हजार 280 रुपये पेयाचे 48 डबे चोरी केले आहे.

लोणावळा शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस हवालदार जयराज पाटणकर, अमोल कसबेकर, नितेश कवडे, सागर धनवे यांनी संबंधित कारवाई करीत आरोपींना अटक केली. या प्रकरणी संबंधितांच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वडगाव यांनी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.