Duleep Trophy 2024 (India B vs India C, 4th Match) : दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये भारत ब आणि भारत क यांच्यातील चौथा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात धावांचा पाऊस पडला. भारत क संघाने प्रथम खेळताना 525 धावा केल्या. प्रत्युत्तरात अभिमन्यू ईश्वरनच्या इंडिया ब संघाने 332 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऋतुराज गायकवाडच्या संघाने 4 बाद 128 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत क संघाने चांगली फलंदाजी केली. इशान किशनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 126 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 111 धावांची शानदार खेळी खेळली तर कर्णधार रुतुराज गायकवाडनेही 58 धावा केल्या. याशिवाय बाबा इंद्रजीतने 78 तर मानव सुथारने 82 धावांची शानदार खेळी केली. या कारणामुळे संघ 525 धावांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. भारत ब संघाकडून मुकेश कुमार आणि राहुल चहर यांनी 4-4 विकेट घेतल्या.
India B vs India C – Match Drawn India C took first innings lead #IndBvIndC #DuleepTrophy Scorecard:https://t.co/bb8A7QO5Ks
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 15, 2024
अभिमन्यूच्या खेळीनं पराभव टळला…
प्रत्युत्तरात भारत ब संघाची फलंदाजी फारशी चांगली झाली नाही. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि एन जगदीसन यांच्याशिवाय बाकीचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. अभिमन्यू ईश्वरन आणि यष्टीरक्षक फलंदाज एन जगदीसन या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 129 धावांची शानदार भागीदारी केली. एन जगदीसनने 137 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. तर अभिमन्यू ईश्वरन क्रीजवर एकटाच टिकून राहिला आणि शेवटपर्यंत बाद होऊ शकला नाही. त्याने 286 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 157 धावांची नाबाद खेळी खेळली. मात्र, दुसऱ्या टोकाकडून साथ न मिळाल्याने संघाला केवळ 332 धावाच करता आल्या. भारत क संघाकडून अंशुल कंबोजने शानदार गोलंदाजी करत 8 बळी घेतले.
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारत ‘क’ संघाकडून कर्णधार रुतुराज गायकवाडने पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळी केली. त्याने 93 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 62 धावा केल्या. रजत पाटीदारनेही 84 चेंडूत 42 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावार भारत ‘क’ संघाने दुसऱ्या डावात 4 बाद 128 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. त्याच वेळी दोन्ही संघांनी सामना अनिर्णित म्हणून संपवण्याचे मान्य केले. सामना बरोबरीत संपला असला तरी पहिल्या डावात आघाडी घेतल्याने भारत ‘क’ संघाला 3 गुण मिळाले.
भारत ‘क’ संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर…
दुसऱ्या फेरीतील विजयानंतर भारत ‘अ’ संघ आता 6 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर भारत ‘क’ संघ आहे, ज्याने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी पहिला सामना 4 गडी राखून जिंकला आहे तर दुसरा सामना अनिर्णित राखला, त्यानंतर त्यांचे 9 गुण झाले आहेत.
Duleep Trophy 2024 : श्रेयस अय्यरच्या संघाचा सलग दुसरा पराभव, भारत ‘अ’ संघ ठरला विजयी…
दुसऱ्या स्थानावर भारत ‘ब’ संघ आहे, ज्याने एक सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णित ठेवला आहे आणि त्यांचे 7 गुण आहेत. सध्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारत ‘ड’ संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे आणि आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.