संप काळात आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम 

नवी दिल्ली: व्यापार वाहतूक ट्रकमालकांनी पुकारलेल्या संपाच्या काळात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या मालवाहतुकीवर 60 टक्‍के परिणाम झाल्याचे आढळून आले. देशातील 80 टक्के ट्रक रस्त्यावर धावण्याचे बंद झाले होते. ट्रक वाहतूक संप करणारे आणि शासन यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी हा संप मागे घेण्यात आला. दिल्लीच्या गुड्‌स ट्रान्सपोर्ट संघटनेकडून आंतरराज्य माल वाहतुकीमध्ये 60 ते 70 टक्‍क्‍यांची घसरण झाल्याची माहिती गुड्‌स ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपूर यांनी दिली आहे. कच्च्या मालाचा पुरवठयात घट दिसून आली. तर राज्यमहामार्गामध्ये टोल नाकयावरील उपलब्ध आकडेवारीनुसार निम्म्याहून जरा जादा ट्रक रस्त्यावर धावत नव्हत्या. गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमधील ट्रक वाहतूक संघटनी त्याचा निर्यातीवरही परिणाम झाल्याचे सांगितले आहे. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)