पुणे – मागील दोन दिवसांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ई-बसमधील गणवेशातील कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पीएमपी कर्मचाऱ्यांना व्हिडीओ आणि फोटो “व्हायरल’ करण्याबाबत प्रतिबंध घातले आहे.
पीएमपीएमएलच्या बस चालकाने टिकटॉकवर एक व्हिडीओ केला होता. बस डेपोमध्ये कामावर असताना त्याने केलेला हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली. बस चालकावर प्रशासनाने निलंबन आणि चौकशीची कारवाई केली. त्यानंतर त्याला बडतर्फही केलं आहे.
@maheshgovardankarprem kont…hi…asho……♬ original sound – suchita vijay??
@maheshgovardankarmay new e bus opning♬ dance music – sunmbalkhangee
@maheshgovardankarसिंगनल तोडनारा साठी♬ original sound – user481695
“प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने, यामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होत आहे. याबाबत आगार व्यवस्थापकांनी आगारातील सर्व चालक, वाहक आणि खासगी बसेसवरील चालक सेवकांना व्हिडीओ किंवा फोटो तयार करून व्हायरल न करण्याबाबत सूचित करावे. यासह वाहक आणि चालकांनी प्रवासी नागरिकांना देखील याबाबतचे व्हिडीओ व्हायरल करण्यास प्रतिबंध करावा,’ याबाबत स्पष्ट सूचना देण्याचे आदेश प्रशासनाने परिपत्रकात दिले आहेत.