‘या’ कारणामुळे ट्विटरच्या भारतातील पब्लिक पॉलिसी हेड महिला कौल यांनी दिला राजीनामा

मुंबई : मागच्या अनेक दिवसापासून सोशल नेटवर्किंग साईट ट्विटर चर्चेत येत आहे. त्यातच आता ट्विटर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण भारतातील पब्लिक पॉलिसी हेड महिला कौल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिमा कौल मार्च अखेरपर्यंत ट्विटरसोबत काम करतील आणि त्यांची जबाबदारी निभावतील, असे ट्विटरने म्हटले आहे. महिमा कौल आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत, असेही ट्विटरने सांगितले.

महिमा कौल ट्विटरच्या भारत आणि दक्षिण आशिया पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आहेत. त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. मात्र तरीही मार्चपर्यंत त्या आपली अधिकृत जबाबदारी पार पाडणार आहेत. महिमा कौल यांचा राजीनामा ट्विटरसाठी नुकसान आहे, परंतु पाच वर्षांच्या आपल्या कामानंतर जवळच्या आणि कौटुंबिक नात्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या इच्छेचा आदर करतो, असे ट्विटरने म्हटले.

शेतकरी आंदोलना दरम्यान ग्लोबल सेलिब्रिटींच्या ट्वीटवरून भारतात जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यात महिमा यांच्या राजीनाम्याची माहिती समोर येण्याच्या टायमिंटमुळे जास्त चर्चा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये ट्विटरने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ट्विटर हँडल काही काळ ब्लॉक केले होते. जानेवारीत संसदीय समितीची बैठक झाली तेव्हा केंद्रीय गृहमंत्र्यांचे ट्विटर हँडल का ब्लॉक केले होते आहे याची कारणे ट्विटर अधिकाऱ्यांना विचारण्यात आली होती.

ट्विटरसाठी भारत तिसर्‍या क्रमांकाचे मार्केट आहे. अमेरिका आणि जपान अनुक्रमे पहिले आणि द्वितीय क्रमांकावर आहेत. भारतात ट्विटरचे कोट्यवधी यूजर्स आहेत, ज्यामध्ये अभिनेते, खेळाडू, सरकारी अधिकारी, राजकारणी आणि इतर व्यक्तींचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.