‘यामुळे’ रायगडावर पर्यटकांना प्रवेशबंदी

रायगड, दि. 1 – राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सात डिसेंबर रोजी किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव रायगड किल्ला सात डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती रायगड-अलिबाग पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही दि. 3 ते 7 डिसेंबर 2021 दरम्यान पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पर्यटकांची गौरसोय होवू नये म्हणून या हेतूने दौऱ्याच्या दोन दिवस आधीच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.