वरुण धवनच्या लग्नामुळे “स्ट्रीट डान्सर’ पुढे ढकलला

वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड येत्या डिसेंबर महिन्यात विवाहबद्ध होत आहेत. त्यामुळेच “स्ट्रीट डान्सर 3 डी’चा रिलीज पुढे ढकलला गेला आहे. ह सिनेमा नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार होता मात्र अलिकडेच त्याची रिलीज तारिख जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यामध्ये पुढे ढकलली गेली. त्यामुळे “स्ट्रीट डान्सर…’चा सामना कंगणा रणावतच्या “पंगा’बरोबर होणार आहे. “स्ट्रीट डान्सर’ पुढे ढकलण्यामागील खरे कारण आता पुढे आले आहे.

लग्नाच्या डिसेंबरमधील मुहुर्तामुळे वरुणने डायरेक्‍टर रेमो डिसोझाला रिलीज पुढील वर्षी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार “स्ट्रीट डान्सर’ मे महिन्यात रिलीज करण्याचे ठरले होते. मात्र नंतरच्या चर्चेतून या सिनेमाला 24 जानेवारीला रिलीज करण्याचे ठरले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुटीनंतरच्या आठवड्यात सिनेमाला अधिक चांगले व्यवसायिक यश मिळू शकेल, असा सर्वांचा अंदाज आहे.

वरुण आणि नताशाचा विवाह सोहळा तीन दिवस चालणार आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाचे नियोजन ज्यांनी केले होते, त्यांच्याकडेच वरुणच्या लग्नाच्या नियोजनाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रियांकाप्रमाणे वरुणने जोधपूरला लग्न करायचे ठरवले आहे. राजस्थानी पॅलेसची निवडही त्यासाठी केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.