टाळेबंदीमुळे मे महिन्यातील जीएसटी कलेक्‍शन घटले

नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक राज्यांमध्ये जी टाळेबंदी जाहीर झाली आहे त्याचा फटका जीएसटी कलेक्‍शनला बसला आहे. मे महिन्यातील जीएसटीचे कलेक्‍शन घटले आहे. मे महिन्यात 1 लाख 2 हजार 709 कोटी रूपये इतके जीएसटी कलेक्‍शन झाले आहे.

गेल्या आठ महिन्यातील हे सर्वात नीचांकी कलेक्‍शन आहे. त्याच्या आधीच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल मध्ये हे कलेक्‍शन 1 लाख 41 हजार कोटी इतक्‍या विक्रमी पातळीवर गेले होते.

तथापि अनेक राज्यांनी आपल्या हद्दीत करोनाच्या संबंधात व्यापक निर्बंध जारी केल्याने त्याचा अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आणि अर्थचक्र मंदावले आहे. त्याचा परिणाम जीएसटी कलेक्‍शनवर झाला आहे. तथापि आता अनेक राज्यांमध्ये अनलॉकिंग प्रक्रिया सुरू होत असल्याने अर्थकारणाला पुन्हा गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.