रेल्वे गेट लॉक झाल्याने कराड मसूर रस्त्यावर कोंडी

रुग्णवाहिकाही अडकली वाहतूक कोंडीत

रुग्णाला कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा जीव कासाविस झाला होता. सरतेशेवटी स्थानिक युवकांच्या मदतीने फाटक उघडून वाहतुकीची कोंडी फोडण्यात यश आले.

कोपर्डेहवेली – कराड-मसूर या रहदारीच्या रस्त्यावरील उत्तर कोपर्डे जवळील रेल्वे फाटक क्रमांक 96 अचानकपणे मंगळवारी रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने लॉक झाले. अपघातानंतर वाहनधारकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र गेटचे लॉक न निघाल्याने दुतर्फा गाड्यांची रांग लागून वाहतूक कोंडी झाली होती. रेल्वे आल्यानंतर वाहतूक थांबवण्यासाठी साखळीचा वापर केला जातो. मंगळवारी अज्ञात वाहनाने गेटला धडक दिल्याने गेटला लॉक बसले. त्याचवेळी रेल्वे आल्याने गेटला साखळी लावण्यात आली. मात्र रेल्वे गेल्यानंतर कर्मचाऱ्याने साखळी खोलण्याचा प्रयत्न केला परंतु चावी न लागल्याने फाटक उघडले गेले नाही. त्यामुळे दुतर्फा गाड्यांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

 

दुपारी बारा ते एक दरम्यान ही घटना घडल्याने वाहनधारकांना उन्हाचे चटके सहन लागले. उन्हाचा त्रासाने वैतागलेल्या प्रवाशी व वाहनधारकांनी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्‍त केला. सुमारे दीड तासानंतर स्थानिक युवकांनी मोठ्या शर्थीने गेट उघडले. काही महिन्यांपूर्वी स्वयंचलित गेट बसवण्यात आले आहे. यामध्ये फाटक उघडण्यासाठी वेळ लागत असल्याने नेहमीच येथे वाहतुकीची कोंडी होत असते. स्वयंचलित यंत्रणेत वारंवार बिघाड होत असून त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.