मागील आठवड्यात मोदी सरकारचा दिमागदार असा शपथविधी सोहळा पार पडला परंतु त्याआधी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हात जोडल्याचा फोटो माध्यमांमध्ये व्हायरल झाला व त्याबरोबरच नवीन अर्थमंत्री कोण असा प्रश्न विचारला जाण्याआधीच त्याजागी पियुष गोयल यांची वर्णी लागण्याची खात्री बोलून दाखवली जाऊ लागली. परंतु शुक्रवारी दुपारी१२ वाजण्याच्या सुमारास अचानक नवं केंद्रीय मंत्रिमंडळ जाहीर केलं गेलं व त्यात अर्थमंत्री पदाची माळ मात्र निर्मला सितारामन यांच्या गळ्यात पडली आणि तत्क्षणी बाजार घसरला. अर्थात,बाजार मागील आठवड्यात साधारणपणे एक टक्क्याची कमाई करूनच स्थिरावला.
एक बैल त्याच्या शिंगांना हवेमध्ये उडवतो, तर अस्वल त्याच्या पंजांना आतमध्ये दुमडून खाली वळवितं. ह्या गोष्टी बाजाराच्या हालचालीसाठी एक रूपक म्हणून आहेत. जर कल उर्ध्व दिशेस असेल तर ते एक बुल मार्केट, म्हणजेच बाजारात तेजी आहे आणि कल जर खालील बाजूस असेल तर बेअर मार्केट म्हणजेच बाजार पडता आहे किंवा बाजारात मंदीचं वातावरण आहे हे दर्शवतं. बुल आणि बेअर मार्केट्स सहसा आर्थिक आवर्तनासह एकत्र येतात, ज्यात चार चरण असतात: विस्तार, शिखर, संकुचन आणि गर्ता.यासाठी डाऊ थेअरीचं उदाहरण घेता येऊ शकतं.आता बाजार किंवा आर्थिक क्रियाशीलता ही काही सरळ म्हणजे एका सरळ रेषेत नाही, तर ती चक्रीय आहे, फार तर त्यांस आवर्तनं म्हणू हवं तर !
‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ मुळे, आगामी मंदीची आवर्तने ही गुंतवणुकीची संधी (भाग-२)
‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ मुळे, आगामी मंदीची आवर्तने ही गुंतवणुकीची संधी (भाग-३)
आर्थिक किंवा व्यावसायिक आवर्तनं ही आर्थिक क्रियाशीलतेची अनुकालिक अथवा काही काळापुरती विस्तार आणि आर्थिक आकुंचन आहेत. अशा प्रकारे उत्पादन अथवा उत्पन्न, रोजगार आणि किंमतीं यांच्या विस्ताराचा कालावधी हा, उत्पादन वा उत्पन्न, रोजगार व किंमती यांच्या संकुचित कालावधीनंतर असेल. विस्तारांचे चक्र व्यावसायिक आशावाद आणि व्यवसायातील नफा वाढविण्याद्वारे दर्शविले जाते याउलट, व्यवसायातील निराशा अथवा व्यवसायातील खुंटलेली वाढ इ. गोष्टी संकुचित आवर्तनाची लक्षणं सांगतात. बाजार अशा चढउतारांबद्दल अंदाज बांधून पुढे चालतो.बाजार तेजीच्या टप्प्याआधी हळूहळू वर जाण्यास सुरुवात करतो आणि तेजीमध्ये तो फोफावतो. त्याचप्रमाणे, बाजार रिकव्हरीचा अंदाज बांधून व नंतरच्या तेजीची अपेक्षा बाळगून, प्रत्यक्ष वास्तविक आर्थिक रिकव्हरी येण्याआधीच हळूहळू वर जावयास लागतो.