संचारबंदीमुळे पुण्याची हवा पुन्हा शुद्ध

हवेच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम

पुणे  -शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन नियमावलीचा सकारात्मक परिणाम हवेच्या गुणवत्तेवर दिसून येत आहे. कमी झालेल्या रहदारीमुळे वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण खालावले असून, शहरातील हवेची गुणवत्ता चांगली’ असल्याची नोंद अभ्यासकांनी घेतली आहे.

शहर परिसरात सातत्याने वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे इतर वेळी हवा प्रदूषणाचा मुख्य स्रोत असलेले वाहतूक आणि औद्योगिक उत्पादन यासारख्या गोष्टी सध्याच्या संचारबंदीमुळे अतिशय मर्यादित प्रमाणात सुरू आहेत. परिणामी, हवेच्या गुणवत्तेवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, हवेतील प्रदूषकांचे प्रमाण घटले आहे.

आयआयटीएम-सफर’ या संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, गुरूवारी शहरातील हवेत पीएम 10 या प्रदूषणकारी घटकाचे प्रमाण 97 प्रति क्‍युबिक घनमीटर तर पीएम 2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 56 प्रति क्‍युबिक घनमीटर नोंदविण्यात आले. प्रमाण मर्यादेपेक्षा हे प्रमाण कमी असून, यामुळे शहरातील हवेची सद्यःस्थिती चांगली असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.