बदलत्या हवामानामुळे जुन्नर परिसरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले

अनेक ठिकाणी रुग्णांनी दवाखाने हाऊसफुल

आळेफाटा – वातावरणातील बदलामुळे आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरासह सर्वत्रच साथीच्या रोगांचा प्रादूर्भाव वाढला असून, अनेक ठिकाणी रुग्णांनी दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. याकेड् लक्ष देऊन आरोग्य खात्याने यावर तात्काळ उपायोजना करावी, अशी मागणी जुन्नर तालुक्‍यासह परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. मागील दीड ते दोन महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती.

ऐन दीपावलीमध्येही थंडीच्या मोसमातही अवकाळी पावसाने जोदार हजेरी लावली होती. दिवाळीनंतर पाऊस उघडल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. धुक्‍याच्या हजेरीमुळे थंडीचा कडाका वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र थंडीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा पिकांवर व माणसांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे या परिसरातील थंडी तर गायबच झाली आहे; परंतु वातावरणात उष्णता वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या रोगांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या या रुग्णांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे या परिसरातील जवळपास शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यातच डासांचाही उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

या डासांना पोषक वातावरण असल्यामुळे डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता असून आरोग्य खात्याने याकडे तातडीने लक्ष देऊन त्यावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. या परिसरात संबंधित ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने डास प्रतिबंधक धुरळणी तातडीने करावी अशी मागणी जुन्नर तालुक्‍यातील नागरिकांमधून केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.