नळाला पाणी न आल्याने नगरपालिकेसमोर अंघोळ

व्हॉल्व्ह दुरुस्त करण्याच्या सूचना : उपनगराध्यक्ष खेंडके

यावेळी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके म्हणाले, जिथे जिथे पाईपलाइनचे व्हॉल खराब असतील ते ताबडतोब दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहे. नागरिकांनी देखील पाण्याचा वापर जपून करून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यास आम्हाला सहकार्य करावे.

श्रीगोंदा – गेल्या आठ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने व शहरात जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने येथील दत्ता जगताप यांनी चक्‍क नगरपालिकेसमोर अंघोळ करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

शहरात गेल्या काही दिवसांत ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने पाण्याची नासाडी झाली. या सर्व प्रकरणी जगताप यांनी वेळोवेळी या गोष्टीत सुधारणा व्हावी, म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले. त्यातच नळाला सुरळीत पाणी नाल्याने सोमवारी सकाळी जगताप हे नगरपालिका कार्यालयासमोर आले. त्यांनी तेथे संबळ वाजवून अंघोळ करत नगरपालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला.

हे अनोखे आंदोलन शहरात दिवसभर चर्चेचा विषय बनला होता. या आंदोलनास संभाजी ब्रिगेड देखील उपस्थित राहून पाठिंबा दिला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अरविंद कापसे, अरविंद राऊत, श्रीरंग साळवे, समीर पांढरकर, सुनील कारंजकर, चंदू आखरे, संजय राऊत, बंडू लोखंडे आदी उपस्थित होते. सतत नादुरुस्ती होत असलेल्या पाईपलाइनचे व्हॉल्व्ह लवकर दुरुस्त करून लाखो लिटर वाया जाणाऱ्या पाण्याच्या अपव्यय टाळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)