काबूल – भारतात रोजगाराच्या फार संधी उपलब्ध नसल्याने अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदूंना भारताऐवजी अमेरिका आणि कॅनडामध्ये स्थलांतरीत होण्याची इच्छा आहे त्यासाठी ते भारतात परत येत नसल्याने या नागरिकांना काबूलमधून बाहेर पडण्यास आणि स्थलांतरास विलंब होत आहे. भारत सरकारचे बचाव कार्य संपवण्यापूर्वी निर्णय घेण्यासाठी त्यांना सावध करण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
काबूलमधील गुरुद्वारा करते परवानमध्ये अद्याप 70 ते 80 अफगाणी नागरिकत्व असणारे शीख आणि हिंदूंना भारतात स्थलांतराची इच्छा नव्हती. ते कॅनडा किंवा अमेरिकेत जाण्यास उत्सुक आहेत. हे अफगाणी नागरिक केवळ एकूण स्थलांतर प्रक्रियेत अडथळे निर्माण करत नाहीत. तर इतरांना बाहेर पडण्यास किंवा स्थलांतर करण्यास देखील विलंब करत आहेत, असा आक्षेप इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीतसिंह चांडोक यांनी घेतला आहे.
भारत सरकारकडून या सर्व नागरिकांना उत्तम सुविधा देण्यात येत आहेत. मात्र, अमेरिका किंवा कॅनडाला जाण्याच्या इच्छेसाठी या लोकांनी दोन फ्लाईट्स चुकवल्या आहेत.
अफगाणिस्तानमधील एका सूत्राने सांगितलं कि, अमेरिका किंवा कॅनडामध्ये स्थलांतर करण्यात काय चूक किंवा नुकसान आहे? उलट जे भारतात स्थलांतरित झाले त्यांचं भवितव्य आम्हाला माहीत आहे. तिथे नोकरीच्या संधी नाहीत त्यामुळे त्यापैकी बरेच जण एकतर परतले किंवा इतर देशांमध्ये गेले.