दैनंदिन भत्ता न मिळाल्याने खेळाडूंची पंचाईत

पालेमबॅंग – आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटू पदकांची लयलुट करीत असतानाच त्यांचा हक्काचा दैनंदिन भत्ता अजूनही मिळाला नसल्याचे समोर आले आहे. स्पर्धा संपत आली, तरी अजूनही भत्ता मिळाला नसल्याने तो नेमका देणार, तरी कधी असा प्रश्न क्रीडापटूंना पडला आहे. क्रीडापटूना 50 डॉलर (3 हजार 500 रुपये) दैनंदिन भत्ता मिळतो. जकार्तासह पालेमबॅंगमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहेत.

पालेमबॅंगमध्ये नेमबाजी, टेनिस आदी खेळांच्या स्पर्धा होत आहेत. भारताचा टेनिसमधील सहभाग जवळपास संपत आला आहे, तर नेमबाजीमधील सहभाग उद्या (ता.26) संपत आहे. या दोन्ही क्रीडा प्रकारातून भारताला तीन सुवर्णपदके मिळाली, पण त्यांना अजून भत्ता मिळालेला नाही. विशेष म्हणजे बहुतांश टेनिसपटू आणि नेमबाज आगामी स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. नेमबाज जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी चॅंगवॉनला रवाना झाले आहेत, तर सुवर्णपदक विजेते टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभाग घेतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व क्रीडापटूंना फोरेक्‍स कार्ड वितरित करण्यात आले आहे, पण त्यावर पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान, इंडियन ऑलिम्पिक संघटनचे (आयओए) उपाध्यक्ष बी. एस. कुशवाहा यांनी फोरेक्‍स कार्डवर लवकरच पैसे जमा केले जातील असे अशी माहिती दिली. फोरेक्‍स कार्डचे क्‍टीवेशन दिल्लीमधून होते, त्यामुळे दिल्लीमधील आयओए अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन भत्ता क्रीडा मंत्रालयाकडून मंजूर केला जातो, पण क्रीडापटूंना तो वेळेत देण्याची जबाबदारी आयओएची आहे. दैनंदिन भत्ता न मिळाल्याने वरिष्ठ क्रीडापटूंवर फारसा परिणाम होत नसला, तरी कनिष्ठ खेळाडूंची कुचंबणा होत आहे. दैनंदीन भत्ता खेळाडूंना स्पर्धेच्या सुरवातीलाच मिळायला हवा होता असे अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)