जोरदार पावसामुळे मुंबई शहराचा वेग मंदावला

मुंबई – आज मुंबईत पावसाने जोरदार हजेरी असून, यावेळी दुचाकी आणि चार चाकी वाल्यांची चांगलीच फजिती झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरात पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाहने संपूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील निर्माण झाले असून, नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

दरम्यान, मुंबईत पडलेल्या पावसामुळे शहराचा वेग मंदावला आहे. जेव्हिएलआर मार्ग, पश्चिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूकही मंदावली आहे. मुंबईची ओळख ही वेगवान शहर अशी आहे. मात्र मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग चांगलाच मंदावला आहे. वाहनांच्या एकामागोमाग रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर लागलेल्या दिसून येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.