अतिवृष्टीमुळे तिलारी घाटात रस्ता गेला वाहून

कोल्हापूर (प्रतिनिधी) – तिलारी-दोडामार्गमार्गे गोव्याकडे जाणारी सर्व वाहतूक चंदगडजवळ तिलारी घाटातील रस्ता खोदलेल्या चरीमुळे व अतिवृष्टीमुळे वाहून गेला. यामुळे सर्व वाहतूक इसापूर चौकुर मार्गे सावंतवाडीकडे वळविण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे आणि एका खासगी कंपनीने केबल टाकण्यासाठी काढलेली चर यामुळेच हा रस्ता खचल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. ए. मांजरेकर यांनी सांगितले. हा रस्ता सुमारे 30 फूट लांब व 2 मीटर रुंदीचा वाहून गेल्याने सर्व वाहतूक ही तत्काळ थांबवून ती पुन्हा मागे वळवून सावंतवाडीमार्गे गोव्याकडे रवाना करण्यात आली. ही घटना रात्री वाहतुकीची वर्दळ कमी असताना घडलयाने सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)