मुंबई – सध्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फेरी अजुन कमी झालेल्या नाही. त्याचवेळी भाजपच्या नेत्यांकडून सरकारवर आणि राष्ट्रवादीवर टीका करण्यात येत आहेत. मात्र आता भाजपच्या वारकरी आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर खालच्या थराची टीका केली आहे.
तुषार भोसलेंनी ट्विट करत म्हटलं की, व्यसनाधीनतेमुळे ज्या पक्षाच्या दस्तुरखुद्द राष्ट्रीय अध्यक्षांचे तोंड कापावे लागलेय त्याच्या प्रवक्त्याकडून नशामुक्तीचे समर्थन कसे केले जाईल?, वो तो बस अपने ‘मालिक’ का धर्म निभा रहा है.
दरम्यान तुषार भोसलेंच्या खालच्या थराच्या टीकेवर अद्याप राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या ट्विटमुळे वाद होण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे.