कराडमधील खोडशी जवळील घटना
कराड –खोडशी, ता. कराड येथील पद्मा हॉटेल समोर सातारा ते कराड लेनवर भरधाव आलेल्या होंडा कारने रस्त्याच्या कडेला वडापसाठी थांबलेला सुरेश राजाराम मस्तके (वय 40, रा. दक्षिण तांबवे, ता. कराड) याला जोरात धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याचे सुमारास घडली.
घटनास्थळी तातडीने हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, प्रशांत संमूख, हायवे टॅपचे कर्मचारी व कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रशांत जाधव पोहचले. त्यांनी सदरचा मृतदेह वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या परिसरात नेहमीच असे छोटे-मोठे अपघात होत असतात.