औषधी बगीचा : दुधी भोपळा

– सुजाता गानू

दुधी भोपळ्यामध्ये गोड आणि कडू असे दोन प्रकार असतात. दुधी भोपळा हे वेलीवर येणारे फळ आहे. गोड दुधी भोपळ्याचा उपयोग खाण्यासाठी करतात. कडू दूधी भोपळ्याला तुंबड्या असे म्हणतात. खाण्यासाठी नेहमी कोवळ्या दुधीचा उपयोग करावा.

गुणधर्म : दुधी भोपळा थंड, सारक, पौष्टिक, गोड, धातुवर्धक, रुचकर, हृदयास हितकारक आणि पित्त व कफहारक आहे. दुधी भोपळ्याचा ताजा रस मातेच्या दूधाप्रमाणे पोषक असतो. कडू दुधी भोपळ्याचा उपयोग पाण्यात पोहण्यासाठी पेटा तयार करण्यासाठी करतात, तर चवीला गोड असणारा दुधी भोपळा औषधासाठीही वापरतात.

दुधी भोपळ्यातील घटक : पाणी 96.3 टक्‍के, प्रोटिन 0.2 टक्‍के, चरबी 0.1 टक्‍के, कार्बोदित पदार्थ 2.9 टक्‍के, कॅल्शियम 0.02 टक्‍के, फॉस्फरस 0.01 टक्‍के, लोह0.7 मि. ग्रॅम.

दुधी भोपळ्याचे औषधी उपयोग : मधुमेही रुग्णांना दुधी भोपळ्याच्या रसाचा उपयोग होतो. कारण यात कार्बोदित पदार्थ कमी असतात. तापामध्ये या रसाचे सेवन करावे. वाफवलेला दुधी भोपळा खाल्ल्याने बद्‌धकोष्ठता नाहीशी होते आणि रक्‍ताम्लता कमी होते. तसेच दुधी भोपळ्याच्या सेवनाने हृदय बलवान होते. दुधी भोपळ्याच्या रसाच्या नियमित सेवनाने वजन संतुलित राहते. हृदयविकार होत नाहीत. बायपास सर्जरीसारख्या महागड्या सर्जरींपासून मुक्‍ती मिळते. दुधी भोपळ्याचा रस नेहमी ताजा घ्यावा. त्यामध्ये थोडी जिरे पूड आणि शेंदेलोण व पांदेलोण घालावे.

क्षयरोग्यांना दुधी भोपळ्याचा रस दिल्याने त्यांचा खोकला कमी होतो व त्यांचे वजनही वाढते. दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन गरोदरपणात शक्तिवर्धक असते. दुधी भोपळ्याच्या रसात थोडा मध घालून प्यायल्याने शरीराचा दाह, घशाची जळजळ, रक्‍तविकार, गळवे, सर्दी, नाकातून रक्‍त पडणे वगैरे विकार नाहीसे होतात. सर्व प्रकारच्या मूत्रविकारात दुधी भोपळा गुणकारी आहे.

नियमित व्यायामानंतर दररोज 100 ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्यायला हवा. हा रस प्यायल्याने बरेच तास आपले पोट भरल्यासारखे राहते व त्यामुळे भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दुधी भोपळा मीठ टाकून उकडून खाल्ल्याने काही दिवसातच वजन कमी होण्यास मदत होते. यात असलेले फायबर अधिक मात्रेत असल्यामुळे भूक कमी लागते व पोट भरल्या सारखे राहते.

उच्च रक्‍तदाब नियंत्रित ठेवते-

जर आपण नियमित पणे एक ग्लास दुधी भोपळ्याचे रस पीत असाल तर आपले उच्च रक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात नियंत्रित राहील. हा रस दररोज ग्राम प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रोल प्रमाण कमी करण्यास मदत होते.

लघवीसाठी उपयोगी-

दुधी भोपळा शरीराला थंडावा देतो. ह्याचा रसात अधिक मात्रेत पाणी असते जे आपल्या शरीराला थंड ठेवते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात दुधी अधिक प्रमाणत खाल्ला जातो. जर आपल्याला लघवी करताना जळजळ होत असेल तर आपण दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस सेवन करावा. कारण जळजळ लघवीमध्ये ऍसिड चे प्रमाण वाढल्यामुळे होते, आणि दुधी भोपळ्याच्या रसामुळे मिळणाऱ्या थंडावाने हे ऍसिडचे प्रमाण कमी होते.

दुधी केसांवर गुणकारी-

दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने वा त्या रसात तिळाचे तेल मिसळवून हे आपल्या केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती कमी होण्यास मदत होईल. तसेच आवळ्याच्या रसात दुधी भोपळ्याचा रस मिसळवून प्यायलाने केसातील कोंडा कमी होण्यासदेखील मदत होते. हे मिश्रण आपण न पिता फक्‍त केसांच्या मुळाशी देखील लावू शकता.

पचनक्रिया चांगली राहते-

पचनक्रियेसंबंधी आजकाल अनेक आजार होत आहेत. त्यामुळे दररोज सकाळी दुधी रस प्यायची सवय करावी. यातील फायबर आपले पचनक्षमता वाढवितात. ह्यात असलेले इलेक्‍ट्रोलाईट शरीरात पचन क्रियेत नियंत्रण ठेवून पोटाचे आजार कमी होतात

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.