-->

दुबईची राजकुमारी एका इमारतीत कैद; शौचालयात बनवलेला ‘व्हिडीओ’ आला समोर

दुबई – दुबईचे शक्तीशाली शासक शेख मोहम्मद बिन रशिद अल मख्तूम यांची कन्या मंगळवारी पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. तिने एका इमारतीच्या शौचालयात तयार केलेला एक व्हिडीओ समोर आला असून आपण या स्थितीत किती काळ जिवंत राहणार याची शंकाच असल्याचे ती यात म्हणताना दिसते आहे.

2018 साली फ्रान्स येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला पकडण्यात आले होते. तेव्हापासून ती जगासमोर आली नव्हती. तिला संयुक्त अमिरातीतल्याच एका इमारतीत कैदेत ठेवल्याच्या दाव्याला यामुळे पुष्टी मिळते आहे.

या इमारतीला जेलचे स्वरूप देण्यात आले असून बाहेरच्या जगाशी आपला संपर्क तोडून टाकण्यात आला आहे. आपण सूर्यप्रकाशही पाहिला नसल्याचे ती या व्हिडीओत म्हणते आहे. हा एक वर्षापूर्वीचा व्हिडीओ असून त्यात ती आपल्या जीविताची काळजी करताना दिसते आहे.

2018 मध्ये एक मित्र आणि एक फ्रेंच व्यक्ती यांच्या मदतीने पळून बोटीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला पकडण्यात आले होते. त्यानंतर तिला कुठे ठेवले याचा कोणालाही पत्ता नाही. शेख लतीफा बिंत मोहम्मद अल मख्तूम असे तिचे नाव असून तिचे वडील सौदी अरबच्या पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती पदावर विराजमान आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.