पुणे – गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेंचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी हा आदेश दिला.
कुलकर्णी यांना मंगळवारी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कोर्टाने लुकआऊट नोटीस बजावली होती. परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक करण्यात आली. तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी कुलकर्णी यांना बुधवारी कोर्टासमोर हजर केले. त्यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती.