सांगली पोलिसांनी घेतला डीएसकेंचा ताबा

तेथील न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी: पुतणी सई वांजपे हिचा जामीन फेटाळला

पुणे: गुंतवणूकदारांची सुमारे 4 कोटी 62 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सांगली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांना मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता ताब्यात घेतले. सांगली येथील न्यायालयात डीएसके यांना हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान डीएसके यांची पुतणी सई वांजपे हिचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला.

आतापर्यंत डीएसके यांनी पुण्यातील 32 हजारहून अधिक गुंतवणूकदारांची 3 हजार कोटीहून अधिक तीन दोषारोपपत्र दाखल केले आहेत. डीएसके न्यायालयीन कोठडीत असून, मागील काही दिवसांपूर्वी येथील न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्यासह अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

सुन तन्वी यांना मात्र न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. सांगली येथे गुंतवणूकदारांची डीसकेंच्या कंपन्यांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डीएसके यांचा ताबा मिळावा, यासाठी सांगली पोलिसांनी अर्ज केला होता. तो अर्ज मंजुर करत येथील न्यायालयाने सांगली पोलिसांना डीसके यांचा ताबा दिला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित भिसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.