पुणे- डीएसके प्रकरणात त्यांच्या सहा वर्षीय नातवाच्या नावावर असलेला चतृ:श्रृंग़ी येथील येथील निवासी बंगला जप्ती यादीतून वगळण्यात यावा, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. हा बंगला नातवाच्या नावावर असून, तो गिफ्ट डीडद्वारे त्याच्या नावावर करण्यात आलेला आहे. कायदेशीररित्या हा बंगला जप्तीसाठी घेता नाही, त्यामुळे हा बंगला वगळण्यात यावा, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. यावर विशेष न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
ऍड. आशिष पाटणकर, ऍड. प्रतीक राजोपाध्ये यांनी हा अर्ज केला आहे. डीएसके यांचा चतुःश्रृंगी येथील 40 हजार स्क्वेअर फूटाचा “सप्तशृंगी ” हा बंगला त्यांच्या सहा वर्षीय नातवाच्या नावावर करण्यात आला आहे. डिसेंबर 2016 मध्ये गिफ्ट डीडद्वारे हा बंगला त्याच्या नावावर करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाच्या नावावर असलेली प्रॉपर्टी जप्त करता येणार नाही. त्याच्या अधिकाराचे पालन व्हावे, म्हणून हा बंगला जप्त मालमत्ता सूचीतून वगळण्यात यावा, असा अर्ज त्याचे कायदेशीर पालक शिरीष कुलकर्णी यांच्यामार्फत करण्यात आला आहे.