शिक्रापुरात दारूभट्टी उद्‌ध्वस्त

शिक्रापूर  -येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी बेकायदा दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी कारवाई करत असताना शिक्रापूर येथे गावठी दारूभट्टी देखील उध्द्‌वस्त केली आहे. याबाबत रविकिरण मोहन जाधव (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना वेळ नदीलगत महाबळेश्‍वरनगर या ठिकाणी दोन युवक गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर माळी, पोलीस नाईक रविकिरण जाधव, किशोर शिवणकर यांनी छापा टाकला. यावेळी पोलीस आल्याची चाहूल लागताच दोघे युवक नदीतून पळून गेले, यावेळी पोलिसांनी ड्रममधील रसायन आणि रसायन नष्ट करून टाकले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here