आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा धोक्यात तुळजापुर : महाराष्ट्राची जगतजननी आई तुळजाभवानी साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ समजले जाते. या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
दि.22 डिसेंबर रोजी रात्री एका तरुण युवकांने मद्य प्राशन करुन भवानी रोड वरील भाविकांना धडक देत 6 जणांना जख्मी केले.
या बाबत सविस्तर वृत असे की तुळजापुर शहरातील भवानी रोड वरील बांगडी व्यापारी चैतन्य शिवाजी गडदे रा.तुळजापुर यांने रविवारी रात्री ९.२० च्या सुमारास भवानी रोड वरील चँनेल गेट जवळ दर्शनासाठी आलेल्या भाविकांना धडक दिली. या घटनेने एकच गोंधळ उडाला. सदरील तरुणाला भाविकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
सध्या तिर्थ क्षेत्र तुळजापुरात नाताळ सुट्टी चालु असल्याने श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.सध्या भवानी रोड ते शहाजी महाद्वार पर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे .