दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पंढरपुरातमधील खळबळजनक घटना : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर (प्रतिनिधी) – पंढरपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पीडितेचे मोबाइलद्वारे अश्‍लील चित्रीकरण करण्यात आले होते. तसेच 2 लाख रुपये द्या नाहीतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी देणाऱ्या 5 तरुणांविरुध्द शुक्रवारी रात्री उशिरा पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रकरणी मनोज माने, आरीफ शेख, अक्षय दिलीप कोळी, माऊली तुकाराम अंकुशराव, साहील सुधीर अभंगराव आदी तरुणांविरुध्द बलात्काराचा भादवि कलम 363, 376 (ड), 376(2) (एन), 384,506,34सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2013चे कलम 4,6,8,12,16,2 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलीला फसवून अंबाबाई पटांगण येथील सुलभ शौचालयाच्या बांधकामावर आरोपींनी नेले. त्याठिकाणी तिला बळजबरीने दारू पाजण्यात आली.त्यावेळेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. तसेच पीडित मुलीवर ऑक्‍टोबर 2018, डिसेंबर 2018 ते 15 ऑगस्ट 2019 च्या दुपारी चार वाजेपर्यंत अंबाबाई पटांगण येथील सुलभ शौचालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी व विष्णुपद येथील झुडपात लैंगिक अत्याचार केले. तसेच पीडित मुलीच्या आईला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन लाख रुपयांची मागणी केली.

आपल्यावर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ शेअर होईल या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. याचाच गैरफायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. तिच्याकडे पैशांची मागणीदेखील करण्यात आली.
काही दिवसांनी पीडित तरुणीच्या घरी तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला आणि त्यानंतर तिच्या आईने विचारले असता या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)