प्रभात इफेक्ट: ‘त्या’ मद्यधुंद चालकाची पीएमपी कडून हकालपट्टी

संदीप कापडे/पुणे: मद्यधुंद अवस्थेतेमध्ये पीएमपी बस चालवणारा चालक चंद्रशेखर अहिरे याच्याविषयी ‘दैनिक प्रभातने’ सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध करत याप्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाकडून घेतली जावी यासाठी पीएमपी व्यवस्थापनाकडे पाठपुरवठा केला. दैनिक प्रभातने या प्रकरणी पाठपुरावा केल्यानेच सदर मद्यधुंद चालकाची हकालपट्टी झाली आहे.

दैनिक प्रभातने कोथरूड डेपोचे व्यवस्थापक विक्रम भवर यांच्याशी संपर्क साधला असता,

“आम्ही सदर पीएमपीएल बस चालक चंद्रशेखर अहिरे याने मद्यधुंद अवस्थेत बस चालवली असल्याच्या घटनेची गंभीर दाखल घेतली असून, सदर चालकास आम्ही त्वरित कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य त्या उपायोजना केल्या जातील.” 

काय होती घटना?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरक्षित प्रवासाची जाहिरातबाजी करणाऱ्या पीएमपीएल बसेस खरंच सुरक्षित आहेत का? असा सवाल आज कात्रज कडून कोथरूड कडे निघालेल्या पीएमपीएल प्रवाशांना नक्कीच पडला असेल. कोथरूड डेपोची बस क्रमांक एमएच १४ सीडब्ल्यू १६७२ घेऊन चालक चंद्रशेखर आहिरे कात्रजवरून कोथरूड कडे निघाला होता. सदर बसमध्ये यावेळी जवळपास ४० प्रवासी प्रवास करत होते. बस सुरु झाल्यानंतर चालक चंद्रशेखर अहिरे याचा बसवरील ताबा सुटत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले मात्र प्रथम प्रवाशांनी याकडे कानाडोळा केला.

जशी जशी बस पुढे जाऊ लागली तसतसे अहिरे हा जास्तच बेफिकीरपणे गाडी चालवू लागला. बसचा दोन वेळा अपघात होता होता राहिल्याने प्रवाशांनी भीतीपोटी बस पद्मावती जवळ थांबवली व चालक आहिरे यास जाब विचारला, जाब विचारात असताना प्रवाशांच्या लक्षात आले की सदर चालकाने मद्यपान केलेले असल्याने अक्षरशः त्याच्या तोंडातून शब्द देखील फुटत नव्हते. सदर चालक दारूच्या नशेत असल्याने तो जाब विचारणाऱ्या प्रवाशांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न करू लागला, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांनी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी बोलावून घेतले. प्रवाशांच्या तक्रारीला त्वरित प्रतिसाद देत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल दरेकर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दारूच्या नशेत असणाऱ्या चंद्रशेखर अहिरेला ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा: मद्यधुंद पीएमपीएल चालकाची ‘संतोष माने’ स्टाईल ड्राइव्हिंग! थोडक्यात बचावले प्रवाशी

 

http://www.dainikprabhat.com/drunk-pmpl-driver-cached-red-handedly-by-police/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)