नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यात एसीबी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. मुंबई, गुजरात येथील ड्रग्जविरोधातील कारवाई ताजी असतांनाच आता झारखंड मधील राची मध्ये ड्रग्ज प्रकरणात एका प्रसिद्ध मॉडल अटक करण्यात आली आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी महिलेचे नाव ज्योति भारद्वाज आहे. ती मागील दोन वर्षांपासून दिल्लीत स्थायी आहे. काही दिवसांपूर्वी ती राचीतील सुखदेव नगर येथे आली होती. येथे ती गांधी नावाचा ड्रग्जची तस्करी करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आली. या परिसरात ड्रग्ज तस्करांचा मोठा सुळसुळाट चालू असून ड्रग्ज तस्कर संबंधित विभागाला न जुमानता दिवसाढवळ्या अवैधरीत्या आरोपी महिला ( मॉडेल ) ज्योति भारद्वाज ड्रग्जची तस्करी करीत होती.
ड्रग्ज तस्करीसाठी ही महिला मॉडेल तरुणांना तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवून ड्रग्जचा अवैध धंदा करायला लावत असे ती पुढे या युवकांचा ड्रग्ज एजंट म्हणून वापर करत असे. गेल्या अनेक ७ ते ८ महिन्यात तिने अनेक युवकांना ड्रग्ज एजंट फसवले आहे. दरम्यान, या संबंधित माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ड्रग्ज माफियांना तपास सुरु केला. ड्रग्जविरोधातील कारवाईत मॉडेल ज्योती भारद्वाज हिला विद्यानगर येथून अटक करण्यात आली असून तिच्याकडून 28 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.