मुंबई – जहाजावरील ड्रग्ज पार्टीच्या संबंधात सध्या एनसीबीकडून जी चौकशी सुरू आहे, त्या अनुषंगाने अभिनेता शाहरूख खान याच्या गाडीच्या चालकाचीही चौकशी करण्यात आली आहे. एनसीबीने बजावलेल्या आदेशानुसार तो शनिवारी रात्री दक्षिण मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात हजर झाला. त्याचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्याला घरी जाऊ देण्यात आले.
दरम्यान या प्रकरणात आज शिवराज रामदास नावाच्या आणखी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. अभिनेता शाहरूखान यांचा मुलगा आर्यन हाही सध्या या प्रकरणात कारागृहात आहे.
गुरुवारी त्याच्या एनसीबी कोठडीत वाढ करण्याची मागणी स्थानिक कोर्टाने फेटाळून लावली आणि त्याच्यासह अन्य सात जणांना चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.