#Drugs Case : आर्यन-अनन्यानंतर होणार ‘या’ स्टारकिडची चौकशी; अभिनेत्याचं ट्विट व्हायरल

मुंबई – अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट विश्लेषक ‘केआरके’ याचं एक सध्या जोरदार चर्चेत आहे. “जर आर्यन खान आणि अनन्या पांडे ड्रग्ज विषयी बोलले हे खरे असेल तर हा गुन्हा आहे. तसेच शनाया कपूरला देखील एनसीबीकडून चौकशीसाठी बोलण्यात येईल..;

या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे. केआरके चे ट्विट सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल होत असून, अनेकांनी त्याचावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत.

त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. दोन दिवस सतत अनन्याची चौकशी करण्यात आली आहे. अनन्या ही अभिनेते चंकी पांडे यांची कन्या आहे. ते स्वत: तिला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन आले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.