मुंबई – ड्रग्ज प्रकरणी बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची एनसीबीकडून मागील आठवड्यात कसून चौकशी करण्यात आली. तर आता एएनआयने दिलेल्या माहितीनुसार अर्जुन रामपाल यांच्या बहिणीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी ) ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावला आहे.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (मुंबई) ने ड्रग्स मामले में फिल्म अभिनेता अर्जुन रामपाल की बहन को समन भेजा: NCB ऑफिसर
— ANI_HindiNews (@AHindinews) January 6, 2021
याआधी अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्सचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती.
दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपुत याच्या आत्महत्यानंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले आहे. यानंतर एनसीबीकडून आतापर्यत बॉलीवूडमधील आघाडीच्या कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे.