Pune Crime | अमली पदार्थ तस्कर घुमरे गजाआड; पाच लाखाचे ब्राऊनशुगर जप्त

- रामटेकडी परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

पुणे – अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रामटेकडी हडपसर परिसरात सापळा रचून जेरबंद केले. महादेव घुमरे (वय.38,रा.रामनगर, रामटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून 5 लाख 3 हजार रुपये किंमतीचे 71 ग्रॅम 990 मिलीग्रॅम ब्राउनशुगर व दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा पाच लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी घुमरे याच्या विरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शखेने अमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथक गुरूवारी दुपारी रामटेकडी परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी त्यांना घुमरे हा एसआरपीएफ ग्रुपकडे जाणाऱ्या रोडने थॉमस गॅरेज समोरील रोडवर अमली पदार्थ घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त सुरेद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, कर्मचारी प्रविण शिर्के, सुजित वाडेकर, मारुती पारधी, पांडुरंग पवार यांच्या पथकाने सापळा रचून घुमरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी करून झडती घेतली असता ब्राऊनशुगर मिळून आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.