एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंसह कर्मचाऱ्यांवर ड्रग्ज पेडलर्सचा हल्ला

मुंबई – नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर ड्रग्ज पेडलर्सकडून हल्ला करण्यात आला. मुंबईतील गोरेगावमध्ये रविवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आल्याचे समजत आहे. 

माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्यासह पाच लोकांची टीम हे कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला पकडण्यास पाच जणांची टीम गेली होती. यावेळी ड्रग्ज पेडलरने हा हल्ला केला. यामध्ये समीर वानखेडेंसह एक जण जखमी झाला आहे. कैरी मेंडिसला एनसीबी ऑफिसमध्ये आणण्यात आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची पाळमुळे शोधण्यासाठी एनसीबीचे समीर वानखेडेंसह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली. तसेच अनेक बॉलिवूड सेलेब्सवर कारवाई केली. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.