मुंबई – करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात पूर्णपणे पोखरून काढले आहे. प्रत्येक दिवशी लाखोंच्या संख्येने विक्रमी करोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे काहींना ऑक्सिजन आणि बेड्स मिळतं नाही आहेत. एवढंच नाही तर रेमडेसिवीर लसींचा तुटवडा जाणवत असल्याने या लसींचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु झाला आहे.
औषधांचा काळाबाजार करणार्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे. https://t.co/S5FIB2GLgx
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 6, 2021
दरम्यान, याच काळाबाजार करणाऱ्यांवर मराठमोळा अभिनेता ‘रितेश देशमुख’ चांगलाच संतापला आहे. यासंदर्भात रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट सुद्धा केले आहे. रितेश आपल्या ट्विट मध्ये म्हणतो कि… “औषधांचा काळाबाजार करणार्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे” या आशयाचे ट्विट त्याने केले आहे. रितेश औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर चांगलाच संतापला असल्याचे या ट्विट मधून दिसून येते.
दरम्यान, रितेश व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड कलाकारांनी औषधे आणि ऑक्सिजनच्या होणाऱ्या काळाबाजारावर संताप व्यक्त केला आहे. या आधी अभिनेत्री रवीना टंडनने ३०० ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवत, औषधांच्या काळाबाजाराव संताप व्यक्त केला.