अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीची धाड; आर्यन खान प्रकरणात WhatsApp चॅट मध्ये अभिनेत्रीचे नाव समोर

मुंबई – अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर आज एनसीबीच्या पथकाने छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्याचा आला आहे. आर्यन खान प्रकरणात WhatsApp चॅट मध्ये अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव समोर आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

आर्यन खान प्रकरणात WhatsApp चॅट मध्ये अभिनेत्री अनन्या पांडेचे नाव समोर आले होते. त्याचबरोबर NCB ची टीम शाहरुख खानच्या घरी मन्नतवर देखील पोहोचली आहे.

बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) तपासाची व्याप्ती वाढत आहे. एनसीबीची एक टीम गुरुवारी सकाळी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी पोहोचली आणि चार ते पाच तासांच्या चौकशीनंतर निघून गेली. एनसीबीच्या टीमने त्यांच्यासोबत अनन्याच्या घरातून काही वस्तूही घेतल्या आहेत, पण त्या काय आहेत हे अद्याप समजू शकले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.