गोव्यात पर्यटकांच्या बुडण्याचा घटना वाढल्या

पणजी: गोव्याचे पर्यटन विकास मंत्री मनोहर अजगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर आलेल्या पर्यटकांच्या बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१६ मध्ये २३, २०१७ मध्ये २६ तर चालू वर्षात आतापर्यंत २२ पर्यटक समुद्रामध्ये बुडून मृत्यू मुखी पडले आहेत. यातील बहुतेक दुर्घटना या सूर्यास्तानंतर घडलेल्या आहेत.
समुद्र दुर्घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता राज्य सरकारने समुद्र किनाऱ्यांवर ‘लाईफ गार्ड्स’ची गस्त अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. लाईफ गार्ड्स यापुढे रात्री ८.३० पर्यंत समुद्र किनाऱ्यावर गस्तीस थांबतील अशी माहिती देखील त्यांनी दिली.
तत्पूर्वी गोवा सरकारने वाढत्या समुद्री दुर्घटनांची शहानिशा करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आला असून धोक्याच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा देणारे फलक लावणे, किनारपट्टीवर पोलिसांची नेमणूक करणे अशा शिफारशी समितीने केल्या आहेत. किनारपट्टी सुरक्षा पोलिसांची गस्त मध्यरात्रीपासून ते पहाटे पर्यंत करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचे देखील पर्यटन मंत्र्यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)