जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढली

टॅंकरने पाणीपुरवठा 260
हजार जनावरे छावण्यांमध्ये 41

सातारा – मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली आहे. माण, खटाव, फलटण तालुक्‍यांमधील 57 चारा छावण्यांमध्ये 41 हजार लहान-मोठी जनावरे दाखल करण्यात आली आहेत. तर जिल्ह्यातील 229 गावे आणि 916 वाड्या-वस्त्यांवरील 3 लाख 77 हजार नागरिकांना 260 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दाखल झाला नाही तर दुष्काळाची भीषणता अधिक वाढण्याची शक्‍यता असून परिणामी टॅंकर व चारा छावण्यांच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे.

सर्वाधिक धरणांचा जिल्हा असून देखील सातारा जिल्ह्यातील दुष्काळ राज्यकर्त्यांचे कर्तृत्व स्पष्ट करीत आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंतची भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहता पाऊस सुरू होण्याची आवश्‍यकता आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात मान्सून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला असता, सरकार आणि प्रशासनाला उपाययोजना करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. जिल्ह्यातील माण तालुक्‍यामध्ये सर्वाधिक 52 चारा छावण्या असून त्यामध्ये 6 हजार 71 लहान तर 34 हजार 307 मोठी जनावरे अशी एकूण 40 हजार 378 जनावरे दाखल झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जनावरे म्हसवड येथील माणदेशी संस्थेकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या नागोबा विकास सेवा सोसायटीमध्ये 8 हजार 50 इतकी जनावरे दाखल झाली आहेत. त्यापाठोपाठ माळवाडीमध्ये 1 हजार 440, हिंगणी गावामध्ये 1 हजार 246, भाटकीमध्ये 1 हजार 98,आंधळीमध्ये 999, मोगराळेमध्ये 375, बिजवडीमध्ये 644, भालवडीमध्ये 1 हजार 386, जाधववाडीमध्ये 368, अनभुलेवाडीमध्ये 553, शेनवडीमध्ये 793, पाचवडमध्ये 712, पांगरीमध्ये 544, वडगावमध्ये 1 हजार 141, बोडके-बोराटवाडीमध्ये 419, दानवलेवाडीमध्ये 491, जांभुळणीमध्ये 848, राजवडीमध्ये 489, येळेवाडीमध्ये 475, पर्यंतीमध्ये 404, मलवडीमध्ये 712, पळशीमध्ये 1 हजार 193, वावरहिरेमध्ये 434, पिंगळी बु.मध्ये 946, बिदालमध्ये 993, दिवडमध्ये 808, दिवडमध्ये 808, कासारवाडीमध्ये 540, तोंडलेमध्ये 393,

इंजबावमध्ये 617, हवालदारवाडीमध्ये 281, कुकुडवाडमध्ये 1 हजार 24, बोनेवाडी-म्हसवडमध्ये 456, शेवरीमध्ये 943, सत्रेवाडीत 612, विरळीमध्ये 796, पानवनमध्ये 414, वाकीमध्ये 327, दिडवाघवाडीमध्ये 314, स्वरूपखानवाडीमध्ये 472, पांढरवाडीमध्ये 511, कुरणेवाडीमध्ये 357, गोंदवले खुर्दमध्ये 215, पळशीमध्ये प्रत्येकी एक छावण्यांमध्ये 448 व 705, धामणीमध्ये 852, वर-मलवडीमध्ये 348, दिवडीमध्ये 293, मार्डीमध्ये प्रत्येकी एका छावणीमध्ये 138 व 268, पुळकोटीमध्ये 49, दहिवडीमध्ये 540, पिंगळी बु.मध्ये 407, पिंपरीमध्ये 217, जाशीमध्ये 520 अशी एकूण 40 हजार 378 जनावरे दाखल झाली आहेत.

पिंगळी खुर्द, वडगाव व टाकेवाडीमध्ये छावण्या मंजूर झाल्या असून अद्याप जनावरे दाखल झालेली नाहीत. खटाव तालुक्‍यात 3 चारा छावण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एनकूळ छावणीमध्ये 490, पडळ छावणीमध्ये 287 अशी एकूण 777 जनावरे दाखल करण्यात आली आहेत. तर हिवरवाडी गावामध्ये छावणी मंजूर करण्यात आली आहे. परंतु अद्याप छावणीमध्ये जनावरे दाखल झालेली नाहीत. तर फलटण तालुक्‍यात सासवड व जावली गावात 2 छावण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या ठिकाणी ही अद्याप जनावरे दाखल झालेली नाहीत.

दरम्यान, दुष्काळामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 77 हजार 710 नागरिकांना 259 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक माण तालुक्‍यातील 77 गावे व 588 वाड्यांना 109 टॅंकर तर खटाव तालुक्‍यातील 48 गावे व 166 वाड्यांना 42 टॅंकर, कोरेगाव तालुक्‍यातील 33 गावांना 36 टॅंकर, खंडाळा तालुक्‍यातील 2 गावांना 2 टॅंकर, फलटण तालुक्‍यातील 34 गावे व 133 वाड्यांना 32 टॅंकर, वाई तालुक्‍यातील 8 गावे आणि 4 वाड्यांना 7 टॅंकर, पाटण तालुक्‍यातील प्रत्येकी 2 गावे व 8 वाड्यांना 6 टॅंकर, जावली तालुक्‍यातील 11 गावे व 9 वाड्यांना 12 टॅंकर, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील 7 गावे व 3 वाड्यांना 4 टॅंकर, कराड तालुक्‍यातील 6 गावांना 3 टॅंकर आणि सातारा तालुक्‍यातील 1 गाव आणि 5 वाड्यांना 2 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.